निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वनविभागाची महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर विविध ठिकाणी यशस्वी नाकाबंदी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातपुडा पर्वतास लागुन असलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमारेषेवर अवैध वाहतुक होण्याची शक्यता लक्षात घेता यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वन विभागाच्या वतीने सर्व वनउपज नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, देशात लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठीचा चौथ्या टप्याचे मतदान महाराष्ट्र राज्यातील ११ मतदारसंघात १३ मे रोजी पार पडले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अवैध वाहतुकीची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्रात व मध्यप्रदेश सिमा रेषेवरील विविध ठिकाणावर येणाऱ्या वनउपज वाहन तपासणी साठी निमगव्हाण गलंगी, वनठाणे व खामखेडा नाका, लासुर सत्रासेन तपासणी नाका, मध्य प्रदेशच्या सिमालगतच्या भागात खामखेडा उमर्टी, खापऱ्यापाडाव बोर अजंटी व वैजापुर मध्यप्रदेशच्या सीमा रेषेवर या ठिकाणी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चोपडा, वनपाल, वनरक्षक, वनमजुर, वनसेवक, पोलीस कर्मचारी, सिआरपीएफचे जवान रात्र दिवस नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात आली.
यावेळी दक्षता बाळगुन वनक्षेत्रातील विविध भागात गस्त देखील करण्यात आली. यावल वनविभागातील अतिसंवेदशील भागात वनक्षेत्रपाल यांनी ताब्यातील वाहनाच्या सहाय्याने मतदान यंत्रणा पहोचविण्यात प्रशासनाला मदत केली. या नाकाबंदीमुळे परप्रांतीय गुन्हेगारांकडून या मार्गाने होणारी दारू, अवैध हत्यार, पिस्तोल, अमलीपदार्थ व लाकुड सह इतर काही अनपेक्षित घडणाऱ्या घटनांवर वचक बसविण्यात संपुर्ण पथकाला यश मिळाले असल्याचे सांगुन नाकाबंदीच्या आज संपलेल्या कार्यकाळात या वनक्षेत्रात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वन्यजिव यावल चोपडा प्रथमेश हाडपे यांनी म्हटले आहे.

Protected Content