आता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला फक्त ६ संधी

मुंबई : वृत्तसंस्था| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळा परीक्षेला बसता येणार आहे.

अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही. इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांना ९ वेळा एमपीएसीच्या परीक्षा देता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे.

एखाद्या उमेदवारानं पूर्व परीक्षेला अर्ज केला आणि परीक्षेला बसला तर त्याचा अटेम्प्ट मोजला जाणार आहे. पूर्व परीक्षेनेंतर पुढील कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचा अटेम्प्ट गणला जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेला हा निर्णय आगामी २०२१ मधील सर्व परीक्षांना लागू होणार आहे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता. लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांची संख्या कमी होईल. परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा आणण्यचा आदेश एमपीएससीनं आज जारी केला आहे. आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहावे लागणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळे एमपीएसीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Protected Content