माळी समाजाने समाज संघटन वर भर द्यावा – विलासराव पाटील

1

1

अमळनेर प्रतिनिधी। माळी समाज हा सर्वात मोठा समाज असून तो मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे समाजाने भविष्यातील आव्हाने समोर ठेवून समाज संघटन वाढवणे ही काळाची गरज आहे. अ.भा. माळी. महासंघाची ध्येय, धोरणे ससेच समाज संघटन यावर मंथन होवून एकत्रित या. तसेच वर्गणी गोळा केल्यांनतर हिशोब दया. जयंत्या पुण्यतिथी, आणि वधु वर परीचय मेळावे हे आवाक्यात ठेवा. उद्योजक शिबीरे घेवून समाजात उद्योगपती कसे तयार होतील यावर समाज मंथन व्हावे असे अखिल भारतीय माळी महासंघाची नाशिक विभागीय सहविचार सभा महाजन हायस्कूल देवपूर धुळे येथे संपन्न झाली तेव्हा अध्यक्षीय भाषणातून विश्वस्त विलासराव पाटील बोलत होते.

व्यासपीठावर वासुदेव देवरे, आर.के माळी, श्रीराम महाजन, संतोष माळी, काशिनाथ माळी, अँड ज्ञानेश्वर महाजन, डॉ स्वप्निल देवरे, भरत रोकडे, डॉ मधुकर चौधरी होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आर. के. माळी म्हणाले. आज सर्वांना नियुक्ती देत आहोत. हे पद शोभेचे नसून प्रत्येकाने समाजकार्य करावे. यासाठी पदरमोड खर्च झाला तरी मागे हटू नका. समाज उन्नती, प्रगती,साठी सर्वांनी एकत्र या. वासुदेव देवरे म्हणाले समाज संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही संघटनेत काम करा पण स्वतःची ओळख निर्माण करा. यामुळे स्वतःची इमेज वाढते, ओळखी होतात, समाजात मान सन्मान मिळतो, असे आवाहन केले. यानंतर नवनियुकती पदाधिकारी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त विलासराव पाटील यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय माळी महासंघाचे समाज संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू व सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहू असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ माळी यांनी केले आभार आर के माळी यांनी केले. प्रशांत महाले वर्षी, मा.सुनिल माळी मांडळ, सुनिल जाधव शिताणे, हिमतराव माळी बेटावद, मनोज सोनवणे धुळे, राजेंद्र माळी म्हसाळे, ह.भ.प.न्हानू माळी गुरुजी धुळे, प्रमोद मगरे शिरपूर, व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content