आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या काळात आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवलीय अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे. 

आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्य़ात आली आहे. याचबरोबर जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

Protected Content