वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे खडकेच्या ग्रामसेवकांना निवेदन

 

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील खडके येथे पाणी, लाईट आणि खराब रस्ते, घाण पाणी साचत असल्याने या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजनच्या महिला आघाडीतर्फे ग्रामसेवकांना करण्यात आली.

खडके येथे विविध नगरी समस्या असून त्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे करण्यात आली. गावांत पाणी, लाईट, खराब रस्ते, गटारींचे साचणारे घाण पाणी आदी समस्या आहेत. गटारींचे पाणी साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून गटारी त्वरित स्वच्छ करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद, महासचिव दिनेश इखारे , जिल्हा महिला महासचिव वंदना सोनवणे, वंचित महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष संगीता भामरे आदी उपस्थित होते.

Protected Content