धर्मादाय आयुक्त कार्यालयात लिपीकला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सातारा येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ लिपीक श्रीकृष्ण पाथर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. न्यास नोंदणीसाठी ते लाच घेत होते. शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार या व्यवसायाने वकील असून त्यांच्याकडील अर्जदार याची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची दोन प्रकरणे ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सातारातील कार्यालयात दाखल प्रकरणाबाबत चौकशीची जाहीर नोटीस काढण्याकरता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दोन प्रकरणांसाठी १००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. याबाबत ही कारवाई लाचलुचपत विभाग उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Protected Content