भुसावळात पोलीस वसाहतीत सरकारी मुद्देमाल जळून खाक ( व्हिडीओ )

aag 1

भुसावळ (प्रतिनिधी)। भुसावळातील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या जुन्या कार्यालयाच्या शेजारी विविध गुन्ह्यातील तिघही पोलीस स्टेशन मधील जप्त करण्यात आलेला मुद्देमालाला मंगळवारी आग लागल्याने एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस वसाहतीमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या जुन्या इमारती शेजारी विविध गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन यांचा ठेवण्यात आलेला असून त्यातील एक रिक्षा ही गॅसकीट लागलेली गुन्ह्यातील जमा केलेली होती.त्या रिक्षेला दुपारी ४:१५ वाजेच्या दरम्यान अचानक तापलेल्या उन्हामुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे ५ ते ७ दुचाकी वाहनाचे व एक रिक्षेचे नुकसान झालेले असुन त्यातील काही वाहनाचे पार्ट आगेमुळे जळून खाक झालेले आहे.अचानक लागलेल्या आगीमुळे काही वाहनांना पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यामुळे वाचविण्यास यश आलेले आहे. तसेच नगरपालिकेचा बंब आग विझविण्यासाठी वेळेवर पोहचल्यामुळे आगेला आटोक्यात आणून बुजविण्यात आले आहे. यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशनला झालेल्या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यत सुरू होते.

पहा : जप्त केलेली सामग्री खाक होतांनाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content