दुचाकी आणि स्कूलबसचा अपघात ; विद्यार्थिनी गंभीर जखमी

जळगाव (प्रतिनिधी) लहान बहीणीला शाळेत सोडून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या आज सकाळी एका स्कूलबसने धडक देत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या अपघातात विद्यार्थिनी जखमी झाली असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना डीमार्ट समोरील मोहाडी फाट्याजवळ घडली.

 

पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) ही विद्यार्थिनी असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण आर्ची आठवीला याच शाळेत शिक्षण घेत आहे. आज मंगळवारी सकाळी सात वाजता पलक ही दुचाकीने (एमएच-१९ सीएम/६६६०) आर्चीला सोडण्यासाठी आली होती. थांब्यावर तिला सोडून बसमध्ये बसविले, त्यानंतर लगेच माघारी फिरली असता डी मार्टकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या शाळेच्याच स्कूल बसने (एमएच-१९ वाय/६२०१) दुचाकीला धडक दिली. त्यात पलक ही दुचाकीसह बसच्या पुढच्या चाकाखाली आली. पलक हिला डोक्याला व कानाजवळ मार लागला आहे. तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Add Comment

Protected Content