दहावीचा निकाल जाहीर; जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के

जळगाव प्रतिनिधी । मुल्यमापनाच्या अधारे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलांनी बाजी मारली आहे.

दरम्यान, निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन केले परंतू संकतस्थळ क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला, त्यामुळे जिल्ह्यात पहिला कोण याची अधिकृत माहिती मिळाली नाही. दहावीच्या परिक्षेला ५८ हजार २७९ विद्यार्थी बसले होत त्यापैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज शुक्रवारी १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. दरम्यान, एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर लॉगिन केल्याने मंडळाची साईट क्रॅश झाली होती.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध राहील.

नाशिक विभागाचा ९९.९६ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा ९९.९७, धुळे जिल्ह्याचा ९९.९८ तसेच जळगाव जिल्ह्याचा ९९.९४ व नंदुरबार जिल्ह्याचा ९९.९९ टक्के निकाल लागला आहे. यात विभागात सर्वाधिक निकाल हा नंदुरबार जिल्ह्याचा आहे. विभागातून 

 

दहावीच्या परीक्षेसाठी ५८ हजार २७९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९४ आहे. विभागात केवळ हिंदी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच हिंदी (द्वितीय, तृतीय भाषा) ९९.९२, मराठी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.९२, मराठी (द्वितीय, तृतीय भाषा) विषयाचा ९९.९७, उर्दू विषयाचा ९९.९५, इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा ९९.९९ तसेच इंग्रजी (द्वितीय, तृतीय भाषा) विषयाचा ९९.९२, गणित विषयाचा ९९.९३, विज्ञान विषयाचा ९९.९६ व सामाजिक शास्त्र विषयाचा ९९.९७ टक्के निकाल लागला आहे.

Protected Content