फैजपूर येथे बचत गटातील महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण विभागाच्यावतीने महिला दिनानिमित्त शहरातील बचत गटातील महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

 

फैजपूर नगरपरिषेच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी वैभव लोंढे हे होते. तर प्रमुख पाहूणे संगीता बाक्षे (कार्यालयीन अधीक्षक), बाजीराव नवले (कर निरीक्षक), दिलीप वाघमारे (वरिष्ठ लिपिक), रशिद तडवी (वरिष्ठ सहाय्यक) उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर , प्रवीण सपकाळे (सहा. प्रकल्प अधिकारी), आशिष मोरे (माविम तालुका व्यवस्थापक), विद्या सरोदे (समुदाय संघटक ), निकिता साळुंखे,  ज्योती सोनवणे यांच्याहस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .

 

लिंबू चमचा या स्पर्धेत( प्रथम), वैशाली राजेश चौधरी (द्वितीय) अनिता राजु परदेशी (तृतीय) निकिता सतीश साळुंके, पारंपरिक वेशभूषेत (प्रथम) सुनिता गजानन भोंबे, (द्वितीय ) कीर्ती विनोद सिंग परदेशी ( तृतीय) चेतना दिपक मंडवाले, तथा संगीत खुर्ची (प्रथम) पारितोषिक अनिता गजानन तांबट, (द्वितीय) पूजा गोकुळ वाघमारे, (तृतीय)  जयश्री नरेंद्र चौधरी.  वकृत्व स्पर्धेत (प्रथम )पारितोषिक संगीता प्रताप परदेशी, (दृतिय) कीर्ती विनोद सिंग परदेशी, (तृतीय ) चेतना दिपक मंडवाले यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन  इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

तसेच राधा राणी महिला बचत गट हरेकृष्ण महिला बचत गट  अनुराधा वसंत परदेशी व ग्रुप यांनी “स्त्री भ्रूणहत्या “वर  उत्कृष्ठ संगीत नाटिका सादर केली. वैभव लोंढे यांनी महिलांचे कार्याचे कौतुक करून प्रत्येक दिवस महिलांचा गौरव झाला पाहिजे असे कार्य आपल्याकडून होत राहो अशा जागतिक महिला दिवसाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या. प्रविण सपकाळे, संगिता बाक्षे, यांनी आपले मत व्यक्त करून विद्या सरोदे यांनी सूत्रसंचलन व निखिता साळुंखे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Protected Content