महिलेचा विनयभंग करून कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वडोदे गावात एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला व त्याच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण गंभीर जखमी केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वडोदा तालुका यावल येथे दिनांक ३ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी फिर्यादी हा आपल्या मुलाबरोबर घरात जेवण करत होता. याप्रसंगी त्याची पत्नी ही घरासमोरील अंगणात खाटेवर बसली असता गावातील राहणारा संशयित आरोपी सूर्यभान बळीराम कोळी याने तिच्याबरोबर जवळ जात तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी तिने आरडाओरड केल्याने घरातील पती व मुलगा तात्काळ बाहेर आले असता संशयित आरोपी सूर्यभान बळीराम कोळी हा तिच्या पत्नीसोबत अश्‍लील चाळे करताना आढळून आले. यामुळे फिर्यादीने त्याच्या तावडीतून पत्नीची सुटका केली. यावेळी विनय भंग झालेल्या महिलेच्या कुटुंबांची आरडाओरड ऐकून गल्लीतील मंडळी फिर्यादी घराजवळ जमा झाली. हे पाहून संशयित आरोपी सूर्यभान कोळी घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतर त्याने त्याच्यासोबत चंद्रभान बळीराम कोळी , बापू बळीराम कोळी यांना घेऊन आणले. त्यांनी फिर्यादी, त्याची पत्नी व मुलगा यांना जातिवाचक शिवीगाळ करून कुर्‍हाड विडा व लाकडी काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने वरील चारही संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.

Protected Content