धरणगाव तालुक्यात चार नवीन कोरोना बाधीत रूग्ण

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यात आज चार नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

आज रात्री आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात चार नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रूग्ण हे धरणगाव शहरातील असून एक रूग्ण हा पाळधी येथील आहे. या वृत्ताला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. या रूग्णांचा निवास असणार्‍या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील ८ रूग्णांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला. तालुक्यात आजवर १८९ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यातील १८ जणांना मृत्यू झालेला आहे. आजवर ११३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ५८ पेशंटवर सध्या उपचार सुरू आहेत.

Protected Content