पाल व खिरोदा येथील हॉर्टीकल्चर कॉलेज आणि टिश्यू कल्चर पार्कबाबत हालचाली

raver nes

फैजपूर प्रतिनिधी । पाल/खिरोदा येथील होर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सीमांकन करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी विध्यापिठांचे कुलगुरू आणि सर्व संचालक येणार आहेत. या संदर्भातील कामाला आजच्या बैठकीने वेग आला आहे. याबाबत आज महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना.हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिलीच बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विद्यापीठातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण बाबत केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला आणि भविष्यातील शिक्षण व संशोधन या बाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी पुणे येथे चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक, अधिष्ठाता, सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष, महासंचालक, संचालक आणि सहसंचालक कृषी परिषद उपस्थित होते.

कुलगुरू पाल/खिरोदा आणि हिंगोणा येथे करणार पाहणी
पाल/खिरोदा येथील होर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सीमांकन करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी विद्यापिठांचे कुलगुरू आणि सर्व संचालक येणार आहेत.या संदर्भातील कामाला आजच्या बैठकीने वेग आला आहे. हिंगोणा जागेची पाहणीही या वेळी कुलगुरू करणार आहेत. हिंगोणा येथे टिश्यू कल्चर पार्क (कंद वर्गीय संशोधन केंद्र) आणि पाल/खिरोदा हॉर्टीकल्चर कॉलेज स्थापने संदर्भात लवकर कार्यवाही करावी अश्या सूचना ना.हरिभाऊ जावळे यांनी या वेळी दिल्या.

मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या रिक्त जागा भरण्याच्या सुचना

मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयात रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरण्याच्या सूचना सबंधित अधिकारी यांना दिल्या.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसोबत उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नवीन संशोधन, सुधारीत अवजारांची निर्मिती,पर्यावरण पूरक नवीन तन नाशक संशोधन आणि विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवावी अश्या सुचना ना.हरिभाऊ जावळे यांनी या वेळी दिल्या.

विविध उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सुचना
नाविन्य पूर्ण उपक्रम म्हणून जळगाव जिल्ह्यातील शेत तळे आणि तलाव या मधे मस्य पालन पिंजरा (केज पोंड) पद्धतीने मस्य पालन करण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञांकडून विविध भागातील आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना ही यावेळी देण्यात आल्या.जळगाव जिल्ह्यातील तापमानात सातत्याने होणारे बदल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या वर पर्यायी पिक व्यवस्था काय असू शकते. यावर चर्चा झाली असता एरंडी, सीताफळ, रेशीम उद्योग हे पर्याय समोर आले. त्यावर अधिकचे संशोधन करण्याच्या सुचना ना.हरिभाऊ जावळे यांनी दिल्या. यावेळी ठाणे आणि पालघर येथे नवीन कृषी व उद्यान महाविद्यालयाच्या स्थापने संदर्भातही चर्चा झाली.

Protected Content