बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; दोन फरार

यावल लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील एका बियरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या चार ग्राहकांकडून बिलापोटी ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांना दुकानदारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, तर यातील दोनजण दुचाकीवरून पसार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेल्या एका बियर शॉप मध्ये बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान संबधीत बिअरबारमध्ये चारजण बियर पिण्यासाठी आले असता त्यांचे बियर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या नोटांच्या बंडलातुन दुकानदारास बिलापोटी दिले. दरम्यान ५०० रुपयांच्या चलनी नोटा या बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअरशॉपवरील व्यक्तीच्या चलनी नोटा बनावट असल्याचे निर्दशनास आले. दुकानदार तडकाफडकी दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या दोन जणांचा सेटर बंद करून पकडून या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात. दरम्यान यातील दोन जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले. या संदर्भात यावल पोलिसांकडून या दोन जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे प्रकार आले आहे. रावेर यावल विधानसभा मतदारसंघ हा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content