रूग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट : जळगावात महामार्गावर थरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगावहून जळगावकडे येणाऱ्या रूग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव येथून जळगावकडे येणाऱ्या एमएच 14 सीएल 0791 या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपच्या जवळ अचानक आग लागली. यात असलेल्या ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यातील ड्रायव्हरने तात्काळ प्रसंगावधान राखत अँब्युलन्सला थांबवत यातून खाली उडी मारली. यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. सदर घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, या रूग्णवाहिकेत हॉस्पीटलमध्ये प्रसूती झालेली महिला ही आपल्या बाळाला सोबत घेऊन घरी जात होती. त्यांच्या सोबत एक डॉक्टर देखील होत्ो. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे हे चौघे पेटत्या रूग्णवाहिकेत्ूान सुरक्षितपणे बाहेर पडल्याने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यात ही रूग्णवाहिका जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. तर, यामुळे वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. पोलीसांनी काही काळाने वाहतुक सुरळीत केली.

Protected Content