अनिल चौधरी यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद

रावेर प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांशी आज भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

याबाबत वृत्त असे की, वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील पाल, गुलाबवाडी, जीन्सी व परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकरींच्या बांधावर पोहचून शेतकर्‍यांना दिलासा व धीर देण्यासाठी आज भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी पोहचले. 

या वेळी अनिल चौधरी यांनी आपण आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत व्हावी यासाठी राज्य सरकार कडे मागणी करणार आहे. तसेच सर्व अधिकार्‍याना विनंती करून तात्काळ पंचनामे करावे व योग्य ती मदत करावे अशी विनंती केली.. 

ते म्हणाले की, अशा संकटाच्या काळात त्यांना दिलासा व मदत मिळणे अपेक्षित आहे. सध्या शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा अनिल चौधरी यांनी व्यक्त केली.

या दरम्यान त्यांच्या सोबत शेतकरी रघुनाथ कोल्हे, दिलीप बंजारा, रोशन तडवी, संजय पाटील, बक्षीपुरचे अनिल चौधरी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.