सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे जळगावात आगमन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे रात्री उशीरा आगमन झाले असून त्यांच्या उपस्थितीत आज अमळनेर व जळगावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे हे एक दिवसाच्या जळगाव दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आज अमळनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा होणार असून नंतर ते मेहरूणमधील कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत.

दरम्यान, काल रात्री एकच्या सुमारास ना. धनंजय मुंडे यांचे जळगावात आगमन झाले असता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे , शहरसंघटक प्रमुख राजू मोरे, महानगर जिल्हाउपअध्यक्ष किरण राजपुत, महानगर सरचिटणीस रहीम तडवी, युवक महानगर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी , कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे , कार्यालय मंत्री राहुल टोके, मजूर फेडरेशन सचिव कोलते आदींसह पदाधिकारी आणि कार्यर्त्यांची उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: