एकनाथराव खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

सध्या जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. शिवसेनेने अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत भाजपला फोडण्याचे काम सुरू केले आहे. जळगाव महापालिकेत यामुळे सत्तांतर झाले आहे. तर, मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे समर्थकांना गळाशी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या  पार्श्‍वभूमिवर, आज खडसे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती होती.

 

याप्रसंगी झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी नाथाभाऊंनी जळगावातील राजकीय समीकरणाबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. विशेष करून राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत येत्या काही दिवसांमध्ये बदल होण्याची शक्यता असून याबाबत याप्रसंगी चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर खुद्द एकनाथराव खडसे यांच्या आमदारकीचा मार्ग देखील मोकळा झाला नसल्याने याबाबतही चर्चेची शक्यता आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.