जामनेर ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप

शेंदुर्णी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यातील ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

आज दि.१२ डिसेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांच्यातर्फे तालुक्यातील शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ.किरण सूर्यवंशी, माजी सरपंच सागरमल जैन, धीरज जैन, फारुख खाटीक तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुभाई जेंटलमन, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद पांढरे, पहूर शहर अध्यक्ष ईश्वर बारी, शहर अध्यक्ष पप्पू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, संदीप हिवाळे, व्ही जी एन टी सेल अध्यक्ष अरविंद चीतोडिया, विधानसभा क्षेत्र प्रमूख किशोर पाटील व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

Protected Content