एरंडोल शिवारात हिंस्र प्राण्याच्या हैदोस

एरंडोल प्रतिनिधी | एरंडोल शिवारात काल रात्री हिंस्र प्राण्याने एक वासरू व एक पारडू फस्त केल्याची घटना घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, गावातील रामचंद्र अण्णा भोई त्यांच्या शेतात मागील बऱ्याच वर्षापासून गुरे ढोरे बांधत असतात. मात्र काल रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने झडप घेत बांधलेले एक वर्षाचे वासरू व एक पारडू फस्त केले आहे.

शिवारात काल रात्री हिंस्र प्राण्याने हैदोस घातला असून त्यामुळे रामचंद्र भोई यांचे जवळपास १५ ते २० हजाराचे नुकसान झाले असून या घटनेमुळे आजूबाजूच्या शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना रात्री पाणी भरण्यासाठी जाताना शेतकरी जीव मुठीत धरून जात आहे.

दरम्यान वनविभागाचे अधिकारी श्री. ठाकरे आणि पशु वैद्यकीय अधिकारी अशोक महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली असून पाहणीअंती मिळालेले ठसे बिबट्यासदृश्य प्राण्याचे असल्याची निदर्शनात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वन विभागाने या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.

Protected Content