Home प्रशासन यावलमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या १५ कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे...

यावलमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या १५ कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते शुभारंभ

0
3


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून जाणाऱ्या बुऱ्हाणपूर-तळोदा राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाला आता गती मिळणार असून, सुमारे १५ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सहा किलोमीटर रस्ते कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. शहरातील भुसावळ टी-पॉईंट येथे केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

बुऱ्हाणपूर-तळोदा हा महामार्ग गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याच्या विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रस्तावित रस्ते कामामुळे यावल शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, वाहनधारकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. सुमारे सहा किलोमीटर अंतराच्या या रस्ते कामासाठी जवळपास १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या भूमिपूजनामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गाच्या विकासामुळे यावल शहरासह परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम होण्यासोबतच यावल शहराच्या विकासालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने या रस्ते कामाकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound