अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तरवाडे येथे जुन्या वादातून दोन महिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथे काल दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी भयंकर घटना घडली आहे. या संदर्भात मारवड पोलीस स्थानकामध्ये विजय सदाशीव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद केले आहे. की, त्यांचा भाऊ संदीप सदाशिव पाटील याने गावातील शरद उखा पवार व ड अलका शेळके मोरे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आणि त्या रागातून ३ सप्टेंबर रोजी शरद व विनोद पवार यांनी संदीप याची पत्नीला गाव दरवाजाजवळ अडवत आमच्याविरुद्ध केलेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर जिवंत सोडणार नाही असे सांगत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यामुळे त्यांची पत्नी घाबरून घरी परत आली.
संबंधीत महिला घरी येऊन हा प्रकार सांगत असतांनाच त्यांच्या घरासमोर विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रूपाबई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार सर्व रा. तरवडे तसेच रातीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील रा. पिंपळे हे आले. त्यांच्याकडे लाठ्या व लोखंडी रॉडसह हातात पेट्रोलची कॅन होती. यात कॅनमधून पेट्रोल काढून त्यांनी फिर्यादीची आई व वहिनी यांच्या अंगावर टाकत त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यासोबत त्यांनी संदीप पाटील यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. याप्रसंगी संदीप यांच्या मदतीसाठी आलेल्या सतीश नागराज पाटील याला देखील मारहाण करण्यात आली.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील लोकांच्या मदतीने संदीप व सतीश यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. संदीप यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून ते अद्याप बेशुध्द आहेत.
दरम्यान, या प्रकरणी विजय सदाशिव पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवाड पोलीस ठाण्यात विनोद सुखदेव पवार, नितीन उखा पवार, रूपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, सर्व राहणार तरवाडे ता. अमळनेर, रतिलाल रामलाल पाटील, हर्षल रतिलाल पाटील आणि प्रमोद रतिलाल पाटील सर्व रा. पिंपळे तालुका अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ३०७, ३५४, ३४१, १४३, १४४, १४८, १४९, ३२३, ५०६ व म.पो. अधिनियम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे हे करीत आहेत.