जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरेश अशोक साळुंखे (वय-४१) रा. भिमनगर, पिंप्राळा हुडको असे मयताचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, नरेश साळुंखे हा पिंप्राळा हुडको येथील भिमनगर भागात एकटाच राहत होता. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याच्या बंद घरातून उग्र वास शेजारच्यांना येत होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी याची माहिती रामानंदनगर पोलीसांनी दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता घरात नरेश साळुंखे याचा खाटावर कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. तीन ते चार दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मृत्यू कश्यामुळे झाला याची माहिती स्पष्ट झालेली नाही. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलकंठ महाजन यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला, पोलीस कॉन्स्टेबल हरीष डोईफोडे हे करीत आहे.