खामगाव येथे पोस्टल लाईफ इन्शुरन्स दिवस उत्साहात

खामगाव प्रतिनिधी । आज १ फेब्रुवारी रोजी पोस्टल लाईफ इन्शुरन्स दिवस खामगाव येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये साजरा केला गेला.

पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजे (पीएलआय) हे एक फेब्रुवारी 1984 ब्रिटीश राजवटीमध्ये सुरू करण्यात आले. आणि त्यानंतर आजतागायात सर्वसामान्यांमध्ये पीएलआयकडे पाहण्याचा एक विश्वास असलेला पोस्ट ऑफिसचा ग्राहक बघत असतो. यामध्ये शहरी आणि ग्रामीण व्यापारीवर्ग देखील मोठ्या प्रमाणात जोडला आहे. आज एक फेब्रुवारी असल्याने स्थानिक खामगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये पी एल आय विभागाच्यावतीने कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

जास्तीत जास्ती पियायला ग्राहक पोस्ट ऑफिस ची जोडल्या जातील यावर चर्चासत्र व मार्गदर्शन काढण्यात आले यावी पोस्ट ऑफिसच पोस्ट मास्तर चंद्रकांत शुक्ला, पीएलआय कक्षाचे इन्चार्ज रवींद्र भागिले, विनायक हिवराळे, पवन आढाव प्रियंका पाटील ,गजानन बेदरकर ,योगेश चंदन असे मिथुन कोडापे अवचार यांच्यासह पीएलआय कक्षाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीएलआय दिवसाचे औचित्य साधून आज ग्राहकांचे असलेल्या शंकांचे निरसन करत त्यांना तात्काळ कर्ज देखील नियमाच्या अनुसरून  देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content