‘महाराष्ट्रानंतर भाजपने झारखंडही गमावलं’ – संजय राऊत

sanjay raut 3

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाराष्ट्रानंतर भाजपने झारखंडही गमावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झारखंडसाठी लावलेली ताकद फुकट गेली, असल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नव्या नागरिकत्व कायद्याचा झारखंडला फायदा होईल, अशाप्रकारची भाषणे केली गेली होती. मात्र तरी देखील झारखंडच्या गरीब व आदिवासी जनतेने भाजपाला नाकारले. यावेळी राऊत म्हणाले की, काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार येईल, अशाप्रकारचे जे आकडे समोर आलेले आहेत. हे पाहता मला असे वाटते की, महाराष्ट्रानंतर झारखंड का गेलं? याचं भाजपाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. नव्या कायद्यानंतर ज्याप्रकारे देशात वातावरण तयार करण्यात आले होते, त्याचा झारखंडमध्ये काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आणखी एक राज्य भाजपाने गमावले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. अशी प्रतिक्रिया झारखंडमधील मतमोजणीचे कल पाहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Protected Content