आरटीओ कार्यालयात शोरूम प्रतिनिधीला जमावाकडून मारहाण

R.T.O. marhan

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शोरूम प्रतिनिधीला १०-१५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज (दि.२३) दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत.

याबाबत माहिती अशी की, प्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेले शो रूम प्रतिनिधी भारत बाळू पाटील आरटीओ कार्यालयाबाहेर उभे असताना यावेळी समोरून मुजम्मिल अल्ताफ अहमद (वय २२) रा.बालाजी पेठ हा तरुण शिवीगाळ करत होता. याचा जाब विचारला असता त्या तरुणांसह इतरांनी भरत पाटील यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला व भांडण सोडवले. या मारहाणीमध्ये भरत पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व हातातील अंगठी संबंधित तरुणाने काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मारहाणीनंतर भरत पाटील हे संबंधितांविरुद्ध तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलिस स्टेशनला आले. या ठिकाणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

Protected Content