‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ११ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.

 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सुसज्ज रक्तपेढीमध्ये रक्तदान केले.

 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, तंत्रज्ञ रोहिणी देवकर, राजेश शिरसाठ, चेतन पवार, जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, संदीप माळी आदींनी सहकार्य केले.

 

यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. विकास पाटील, डॉ. मोईज देशपांडे, महानगर समन्वयक दीपक घ्यार,शहर समन्वयक चेतन परदेशी, मुक्ताईनगरचे विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, विशाल परदेशी, दीपक पाटील, अनिल पवा, राहुल पाटील,  शुभम सपकाळे, धीरज राठोड, गोपाल मोरे, रोशन ठाकरे, विशाल पारधी, विजय कोळी, राजेंद्र सपकाळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content