चाळीसगावात ७३ लाखांचा गुटखा जप्त

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ओझर गावाजवळ पोलिसांनी कंटेनरच्या केलेल्या तपासणीत ७३ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चाळीसगावसह परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आधी देखील अधोरेखीत झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, ओझर गावाजवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मध्यप्रदेशातून येणार्‍या एका कंटेनरमध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्‍वभूमिवर, ओझरजवळ पोलिस पथकाने सापळा लावला. यात या कंटेनरमध्ये ७३ लाख ८७ हजार रूपयांचा गुटखा आढळला आहे. पोलिसांनी गुटखा व कंटेनर असा ९३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनर चालकासह दोघांना पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई काल सायंकाळी चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन कापडणीस, सागर ढिकले, दीपक बिरारी, पीएसआय विष्णू आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, महेंद्र पाटील,अमोल पाटील, अमोल भोसले, विनोद पवन पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content