‘चुन चुन के, गिन गिन के मारेंगे !’ : शिंदे गटाच्या आमदाराची धमकी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना आणि शिंदे गटातील हाणामारी नंतर आमदार संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

काल बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटात तुफान हाणामारी झाली होती. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज शिवसेनेला इशारा देतांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की शिवसेनेच्या संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे. असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

आमदार संजय गायकवाड हे आधीदेखील आक्षेपार्ह वक्तव्याबाबत वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आता तर त्यांनी थेट शिवसैनिकांना चुन चुन के मारण्याची धमकी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content