Home Cities अमळनेर स्व. उदय वाघ यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली

स्व. उदय वाघ यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली

0
101

अमळनेर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत उदयबापू वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण केली.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मारकाला स्मृतीदिनानिमित्त सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. त्यांच्या स्मारकावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यासोबत खासदार उन्मेष पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन आदींनी देखील उदयबापू वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडा, वसुंधरा लांडगे, अभिषेक पाटील, प्रवीण जैन, बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल पाटील, माजी संचालक विजय पाटील, माजी सभापती श्याम अहिरे यांच्यासह परिसरातील जनतेने देखील दिवंगत उदय वाघ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.


Protected Content

Play sound