पोहरे येथून अज्ञाताने लांबवली दुचाकी; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना तालुक्यातील पोहरे येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पोहरे येथील रामभाऊ उध्दव माळी (वय-३३) यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीएफ ३७२) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. त्यावर रामभाऊ उध्दव माळी यांनी परिसरात आजपावेतो शोधाशोध केली असता १५ हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल मिळून आले नाही. म्हणून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने रामभाऊ उध्दव माळी यांनी मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content