घाटकोपराच्या होर्डीग दुर्घटनेनंतर महापालिकेची बेकायदेशीर होर्डीगवर कारवाई सुरू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करायला सुरूवात केली आहे. रेल्वेत हद्दीत असलेल्या तीन अनाधिकृती होर्डींग हटवण्याची सुरूवात झाली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत १४ लोकांचा बळी गेला. होर्डिंग दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते.

प्रशासकीय यंत्रणांची बेपरवाई किती घातक ठरते याचा हा नमुना आहे. रेल्वे पोलीस या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं समोर येत असले तरी महापालिका प्रशासनाची ही जबाबदारी आहे. होर्डिंग बेकायदा होतं आणि त्याला रेल्वे पोलिसच जबाबदार आहेत हे दुसऱ्या दिवशी हे स्पष्ट झाले.होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती.

Protected Content