मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्या १५ मे रोजी मुंबईमध्ये सायकांळी साढे सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. हा रोड शो ईशान्य मुंबई मतदारसंघात होणार आहे. हा रोड शो पावणे आठ वाजता संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.
आपण सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी जरूर यावे असं सांगत विकासपुरुष आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येण्याचे आवाहन ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केले आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.
उद्या मुंबईमध्ये होणार पंतप्रधान यांचा रोड शो
11 months ago
No Comments