कल्पीता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शेंदुर्णीत कामबंद आंदोलन

शेंदूर्णी प्रतिनिधी | ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका व नगर पालिका कर्मचारी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत असून आज शेंदूर्णी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व कामबंद आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी पाणीपुरवठा अभियंता काझी, पंकज गुजर,दिनेश ठाकूर,सागर गुजर,सुनील निकम,कपील साळुंखे, लोकेश साळी, हेड क्लार्क कलीम शेख ,विकास सपकाळ, विलास जोहरे,इरफान शेख, व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

कार्यालय अधीक्षक सोंजे यांनी निवेदन स्वीकारले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे.

 

Protected Content