अमळनेरकरांना सतर्कतेचा इशारा : बोरी नदीच्या पत्रात न जाण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी ।  पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी वाढल्याने  बोरी धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.  अमळनेरकरांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे. 

 

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने बोरी धरण, तामसवाडीची  पाणी पातळी २६७.११ मी.  सध्या झाली आहे.  सकाळी  ११ वाजता धरणाचे  ७  दरवाजे  ०.१५ मीने उघडून ३१६० क्युसेस विसर्ग नदी पात्रात  सुरु आहे.  विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने  अथवा गुरे ढोरे घेऊन नदी पात्रात जाण्याचे साहस करू नये.तसेच इतरांनाही याबाबत समज द्यावी असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी अमळनेरकरांना केले आहे.

 

Protected Content