तरुणाचा रस्ता अडवून जबरी सोन्याची अंगठी व रोकड लांबविली

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील राजा गार्डन हॉटेलमध्ये तीन जणांनी जबरी हातातील सोन्याची अंगठी व पाकिटातील रोकड जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात शुक्रवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर किशोर गायकवाड (वय-२८) रा. विद्यानगर धुळे रोड, अमळनेर हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मयूर हा अमळनेर शहरातील राजा गार्डन हॉटेल येथे जेवणासाठी गेला होता. जेवण आटपून घरी परतत असताना त्याचा रस्ता अडवून मयूर सजन पाटील रा. सुरत, गुजरात, विशाल दशरथ चौधरी आणि विजय मधुकर शिंगाणे दोघे रा.अमळनेर यांनी हातातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि खिशातील दीड हजार रुपये असा एकूण १६ हजार ५०० मुद्देमाल जबरी चोरून नेला. या संदर्भात मयूर किशोर गायकवाड यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

Protected Content