गोलानी मार्केट परिसरातून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट जवळील अमर रगडा येथून एकाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्षद रज्जाक शेख (वय-२२) रा. शिरसोली नाका बिस्मिल्ला चौक, तांबापुरा जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अर्षद हा गोलानी मार्केट जवळील अमर रगडा जवळ दुचाकी (एमएच १९ सीसी ६८१३) ने आलेला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाने त्याचा दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही अखेर शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.

Protected Content