नांद्रा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पौढाचा मृत्यू

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  नांद्रा ता. पाचोरा येथील बसस्थानका समोर उभे असलेल्या ईश्वर भिका पाटील (वय – ५५) यांना जळगाव कडून पाचोरा कडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या चार चाकी वाहनाने रात्री ८:३० च्या सुमारास धडक दिल्याने ईश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले होते. येथील अशोका कंपनीच्या रुग्णवाहिकेतुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र २८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती व हातमजुरी मजूरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

गतीरोधकची मागणी

येथील महामार्ग क्रमांक ७५३ जे चे काम झाल्यापासून रस्त्यावर भरधाव वेगाने वाहतूक सुरू असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. अनेक वेळा गतीरोधक ची मागणी करण्यात आली आहे. तरी या गतीरोधकाच्या मागणी कडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या अपघातानंतर तरी नांद्रा गावातील हद्दीत माध्यमिक विद्यालया पासून ते गावाच्या बाहेर पर्यंत गतीरोधक करण्याची मागणी होत आहे.

Protected Content