ऑगस्टमध्ये बँकांना ९ दिवस सुट्टी

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था ।  ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात बँकांना ९ दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे.

 

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात.  कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे.

 

मुंबई आणि नागपूर विभागातील बँकांना १६ आणि १९ ऑगस्ट रोजी सुट्टी असणार आहे. १६ ऑगस्टला पारसी नववर्षानिमित्त तर १९ ऑगस्ट रोजी मोहर्रमनिमित्त महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. पाच रविवार आणि दोन शनिवार (दुसरा आणि चौथा) असे सात दिवस म्हणजेच एकूण ९ दिवस राज्यातील बँका बंद राहणार असल्याने ३१ दिवसांपैकी केवळ २२ दिवसच राज्यांमधील बँकांमध्ये व्यवहार होणार आहेत. १६ तारखेची सुट्टी ही सोमवारी असल्याने १४,१५,१६ अशी सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने महिन्याच्या मध्यवर्ती दिवसांमध्ये बँकेची काम न ठेवल्यास आर्थिक व्यवहार खोळंबणार नाहीत.

Protected Content