देशाची अर्थव्यवस्था मागील ७० वर्षांतील सर्वात वाईट स्थितीत : राजीव

164790 rajeev

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेत रोखी उपलब्धतेत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नीती आयोगाचे उपाध्यक्ष, अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर चिंता केली आहे. एवढेच नव्हे तर, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत असून गेल्या ७० वर्षांमध्ये पाहायला मिळाली नाही, अशी वाईट स्थिती सध्याच्या घडीला निर्माण झाली असल्याचेही राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

राजीव कुमार म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातच नव्हे तर, खासगी क्षेत्रात देखील कोणी कोणाला कर्ज देऊ इच्छित नाही. तसेच नोटबंदी आणि जीएसटीबाबतच्या निर्णयांनंतर रोखीचे संकट वाढले आहे. यावर सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्था बदलून गेली आहे. पूर्वी सुमारे ३५ टक्के रोखी उपलब्ध होती, आता मात्र यात बरीच घट झालेली दिसत आहे. यामुळे स्थिती अत्यंत अवघड बनली आहे, अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली आहे.

 

 

Protected Content