राज कुंद्रा-सचिन वाझेमध्ये देवाण घेवाण झालीये का?; राम कदमांना शंका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाजेचे साहेब पण सहभागी आहेत का? अशा शंका भाजप आमदार राम कदम यांनी  उपस्थित केल्या आहेत.

 

पॉर्न फिल्म  गुन्ह्यात अटक झालेला राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेकांना लुटलं, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला होता.

 

भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम ट्विटमध्ये म्हणतात, ४ फेब्रुवारी २०२१मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. मुंबईतल्या मड भागात ग्रीनपार्क या बंगल्यात पॉर्न फिल्मचं चित्रीकरण होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला होता. त्यावेळी गुन्हे शाखेत सचिन वाझे हे वसुलीबाज अधिकारी होते. तेव्हा ९ लोकांना अटक करण्यात आली होती आणि १० वा होता राज कुंद्रा. पण त्याला अटक करायला ५ महिने १५ दिवस का लागले? त्याला कोण वाचवत आहे? वाझे आणि राज कुंद्रा या दोघांच्यात काही बोलणं, भेटणं किंवा देवाणघेवाण झाली आहे का? या गोरखधंद्यात वाझेचे साहेब पण सहभागी होते का? कोणाच्याही आशिर्वादाशिवाय कुंद्रा ५ महिने १५ दिवस अटकेपासून कसा काय वाचला?

 

 

 

या पूर्वीही राम कदम यांनी राज कुंद्रावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप केला होता.

 

Protected Content