माजी आमदार स्मिता वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार स्मिता उदय वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

 

भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष व माजी माजी आमदार स्मिता उदय वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अमळनेर व सौरभ भाऊ मित्र परिवारातर्फे शासकीय रुग्णालय अमळनेर व शनि मंदिर येथे फळ व अल्पोपाहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौरभ पाटील, योगीराज चव्हाण, शिवकिरण बोरसे, रवि ठाकुर, जगदीश पाटील, सागर शेटे, सागर बारी, निनाद जोशी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content