पाच लाखाची लाच स्वीकारली ; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपसंचालकासह चौघांना अटक

safe image

 

अहमदनगर (वृत्तसंस्था) नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जात पडताळणी समितीच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांना प्राधिकत केलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अर्ज केला होता. परंतु अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (रा.वसंत विहार शिवाजी चौक, सिडको, नाशिक) यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. तर उपसंचालक व विधी अधिकारी यांच्यावतीने खाजगी इसम सचिन उत्तमराव महाजन (वय ३३ वर्ष, धंदा खाजगी वालक, रा.वसंत विहार, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), मच्छिद्र मारुती गायकवाड (वय ४८ वर्ष, धदा. नोकरी, रा. गुर्ण आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, एम.आय.डी.सी.) लाचेची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष मध्यरात्री एक वाजता शिर्डी येथील हॉटेल साई आसरा समोर चौघांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली असून जात पडताळणी समितीतील भ्रष्टाचार उघड झाला आहे.

Protected Content