यावल तालुक्यात छुप्या मार्गाने पानमसाला गुटक्याची विक्री

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । तालुक्यात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या इतर राज्यातुन तस्करीतुन आयात करून विक्रीस येणाऱ्या मौखिक आरोग्याच्या विविध समस्या निर्माण करणारा विमल पानमसाला गुटक्याची सर्रासपणे उघडपणे सार्वजनिक ठिकाणी पानटपऱ्यापासुन तर किराणा दुकानात लाखो रुपयांच्या पानमसाला पुडयांची विक्री करण्यात येत असुन या नागरीकांच्या आरोग्यास निगडीत विषयाकडे संबधीत अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे अनेक पालक व सुज्ञ नागरीकांकडून करण्यात येत आहे तर कार्यवाही कोण करणार असा प्रश्न पडला आहे .

यावल ,चोपडा आणि रावेर हे तिन्ही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असुन सीमा रेषेवर गुजरात आणि मध्यप्रदेश अशी दोन राज्य हे तालुक्यास लागून असल्याने या दोन्ही राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटका या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटी व्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटका किंग कडून करण्यात येत असून नंतर तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे. शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानीकारक पानमसाला गुटक्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६० लाखाची विक्री करण्यात येत आहे.

या बाबतची माहीती संबधीत अन्न व प्रशासन  विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे .

Protected Content