Home क्राईम वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त : मात्र कारवाई गुलदस्त्यात !

वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त : मात्र कारवाई गुलदस्त्यात !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वढोदा येथील तलाठ्यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला असला तरी यावरील कारवाई गुलदस्त्यात असल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एमएच १९ झेड ०८८६ क्रमांकाचा ट्रक उभा करण्यात आला असून यातून वाळू वाहतूक होत असल्याने त्याला जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तथापि, चार दिवस झाले तरी यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे ? याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने या ट्रकवर कारवाई करणारे वढोदा येथील तलाठी श्री. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता पहिल्यांदा त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगून मी तुम्हाला उत्तर देतो असे सांगितले. तर नंतर त्यांनी कॉलच उचलला नाही. तर, या ट्रकबाबत माहिती समोर यावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound