प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथे रात्री दहा साडेदहा वाजेच्या सुमारास पेठ ग्रामपंचायत इमारतीखाली अंडापाव गाडीवर सतिष कडूबा पांढरे व राहूल नाना भोंडे या युवकांवर चाकूने सपासप वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर प्राणघातक हल्ल्यामुळे पहूर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्ला करणारे संशयित रोहित उर्फ चिक्या दिपक थोरात, शुभंम रमेश पाटील. व बंडू एकनाथ पाटील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ले खोर तीनही आरोपींनी घटनास्थळावरून पळून गेले.

दरम्यान रात्रभर पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेटे, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी, भरत लिंगायत,  ईश्वर देशमुख, विनय सानप, रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे यांनी रात्रभर पहूर परिसर पिंजून काढत सदर आरोपी हिवरखेडा शिवारातून शेतीच्या बागेतून अटक केली.

यात शुभम रमेश पाटील,  बंडू एकनाथ पाटील, या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यातील रोहित दीपक थोरात उर्फ चिक्या हा फरार झाला आहे त्याचा पोलीस तपास करीत आहे.

दरम्यान अटक केलेले शुभम रमेश पाटील व बंडू एकनाथ पाटील या दोघा आरोपींना घटनास्थळापासून पहूर बस स्थानक मार्गे थेट पहूर पोलीस स्टेशनपर्यंत हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढण्यात आली. धडकी भरणे, व्यापाऱ्यांना चाकू दाखवणे, हे चाकू व तलवार घेऊन फिरतात, दहशत माजतात यांचेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करून त्यांना हद्दपार करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे

सतीश कडूबा पांढरे व राहुल नाना भोंडे या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले असून आज दुपारी पहूर पोलीस स्टेशनला गंभीर जखमी असलेले सतिश पांढरे यांचे भाऊ विलास कडूबा पांढरे राहणार खंडेराव नगर पहूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित दिपक थोरात उर्फ चिक्या शुभम रमेश पाटील बंडू एकनाथ पाटील या आरोपींविरुद्ध पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे. बसस्थानक परीसरात काही वेळ तणाव पूर्ण वातावरण निर्माण झाले होते काही वेळाने तणाव कमी झाला.

Protected Content