व्यापार्‍यास शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी : गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून व्यापार्‍यास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी येथील एका फळविक्रेत्याच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबतचे वृत्त असे की येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकातील बर्‍हाणपूर रोडवरील गोटू शेठ यांच्या दारूच्या दुकानाच्या समोरून येथील हार्डवेअरचे व्यापारी संतोष सुनिल गोंदवानी हे त्यांचे वडीलांच्या सोबत मोटार सायकलने जात असतांना फळ विक्रेता शेख सईद शेख कादर यास धक्का लागला. याचे वाईट वाटून सईद याने संतोष गोंदवानी व त्याचे वडील सुनिल गोंदवानी यांना शिवीगाळ करून सईद याने संतोष यास फळ कापण्याच्या ब्लेड पट्टीने मारण्याचा प्रयत्न केला.

त्याने तो चुकविल्याने त्याची मागील पँट फाटून नुकसान केले . व ब्लेड पट्टीने मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत संतोष गोंदवानी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून शेख सईद याचे विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.

Protected Content