सातपुडातील वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या बेतात असलेल्या सहा जणांना अटक

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुड्याच्या जंगलातील वनक्षेत्रात शिकारीच्या बेतात असलेल्या सहा जणांना शिकारीच्या साहीत्यासह फिरस्तीवर असलेल्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले असून या वन विभागाच्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ८१वड्री खु. येथे दि. २७ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास वन विभागाचे पथक हे जंगल फिरस्तीवर असतांना आसराबारी पाडा या आदीवासी वस्तीवरील विद्युत खांबावरून याठिकाणी केबल व सेट्रींग लोखंडी तार २४o मीटर लांब झाडोरामधून वड्री धरणाकडे येणाऱ्या नाल्यात पाणी असलेल्या ठिकाणापर्यंत पसरवून वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विज कनेक्शन चालू स्थितीत पथकास आढळून आले.

सुदैवाने या ठीकाणी गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व वनपाल डोंगर कठोरा, वनरक्षक वड्री, मोहमांडली उत्तर, हरिपुरा, निंबादेवी पश्चिम, आंबापाणी हे सर्व जण थोडक्यात बचावले. याबाबत दिनांक २८ नोव्हेंबर रोजी वन विभागाने केलेल्या कारवाईत या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणुन लावऱ्या कालू बारेला, राकेश रविन्द्र चौधरी, नान्हु धनसिंग पावरा, किरण वारसिंग बारेला, रमेश तारासिंग बारेला आणि लालसिंग रेवा बारेला सर्व राहणार आसराबारी पाडा ( वड्री खु ) तालुका यावल यांना अटक करण्यात आली आहे.

वनसंरक्षक धुळे, उपवनसंरक्षक शेख, यावल वनविभागाचे वावरे, विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे, हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यवाही सहाय्यक वनसरंक्षक विक्रम पदमोर हे पार पाडत आहेत.

Protected Content