इच्छापूर तांड्यात किरकोळ कारणावरून एकास जबर मारहाण!

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील इच्छापूर तांडा येथे दाम्पत्य दुचाकीवरून जाताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस स्थानकात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

                याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करगाव इच्छापूर तांडा क्र. १ येथील विजय छगन राठोड (वय-४५) हा पत्नीसह दुचाकीवरून गावातील हनुमान मंदिर जवळून जात असताना ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार यांच्या पायाला धक्का लागला. त्यावर ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार व दिपक लक्ष्मण पवार दोघेही रा. करगाव इच्छापूर तांडा क्र. १ यांनी विजय छगन राठोड याला चापटबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान दिपक लक्ष्मण पवार यांनी रोडवरील दगड उचलून विजय छगन राठोड याच्याकडे फेकून मारल्याने विजय हे जखमी झाले. हि घटना बुधवार रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय छगन राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ३३७, ५०४ अशा विविध कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.

Protected Content