डांभूर्णी येथे यात्रा पाहण्यासाठी आलेल्या नातवाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभूर्णी येथे मामा गावी आजोबाकडे यात्रा पाहण्यासाठी आलेल्या १० वर्षीय बालकाचा विजेचा धक्क्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भडगाव येथील भावेश साईना बागुल हा दहा वर्षीय बालक यात्रे निमित्त डांभूर्णी येथे मामाच्या गावाला आजोबा अशोक नामदेव सपकाळे यांच्याकडे १७ डिसेंबर रेाजी आला होता. त्याच दिवशी गावात नळाला पाणी आले होते. अशोक सपकाळे यांच्या नी विद्यूत मोटार लावून पाणी भरत होते. यावेळी ओटा संपुर्ण ओला होता. दरम्यान खेळायला बाहेर निघालेल्या बालक भावेश ओट्यावर आला असता त्याचा विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात तो ओट्यावरून खाली कोसळला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता त्याचा मयत घोषीत केले. शवविच्छेदन करून रात्री उशीरा शोकाकूल वातावरणा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. भावेच्या अशा या दुर्दैवी मृत्यूमुळे भडगाव आणि यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content